अफगाणिस्तानमध्ये कोसळलेले विमान भारतीय नाही; DGCAने दिले स्पष्टीकरण

अफगाणिस्तानमध्ये कोसळलेले विमान भारतीय नाही; DGCAने दिले स्पष्टीकरण

काल रात्री हे विमान रडारवरून गायब झाले होते. त्यानंतर त्याचा अपघात झाल्याचे कळले. या विमानात किती जण होते. त्यापैकी किती सुरक्षित आहेत, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

भारतातून उझबेकिस्तानमार्गे मॉस्कोला जाणारे चार्टर्ड विमानाला अफगाणिस्तानमध्ये अपघात झाला. हे विमान अफगाणिस्तानच्या बदख्शान प्रांतात कोसळले असून त्यात सहा जण असल्याचे सांगितले जात आहे. अफगाणिस्तानने हे विमान भारतीय विमान असल्याचे सांगितले. मात्र, भारताने हा दावा फेटाळला आहे.

भारताचे विमान असल्याचा दावा-

अफगाणिस्तान मीडियाने सूत्रांच्या हवाल्याने, मॉस्कोला जाणारे निमान हे भारतीय विमान असून शनिवारी बदख्शानच्या वाखान भागात कोसळल्याचे सांगितले. या घटनेची चौकशी करण्यासाठी एक पथक या भागात रवाना करण्यात आले असून या दुर्घटनेत जीवितहानी किंवा अपघाताच्या कारणाबाबत अद्याप माहिती दिलेली नाही.

भारताने दावा फेटाळला-

हे विमान भारताचे असल्याचे सुरुवातीला सांगितले गेले. मात्र, हे विमान भारताचे नाही. भारताचे कोणतेही विमान अफगाणिस्तानच्या दिशेने गेले नाही, असा खुलासा नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाकडून करण्यात आला.

बदख्शान प्रांतातील कुरण-मुंजन आणि झिबाक जिल्ह्याजवळील डोंगरावर कोसळलेले विमान मोरोक्कनचे नोंदणीकृत DF 10 विमान होते, असे नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

काल रात्री हे विमान रडारवरून गायब झाले होते. त्यानंतर त्याचा अपघात झाल्याचे कळले. या विमानात किती जण होते. त्यापैकी किती सुरक्षित आहेत, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in