काशी विश्वनाथ मंदिरातील पोलीस आता धोती-कुर्त्यात

यापूर्वी २०१८ साली अशाच प्रकारचा प्रयोग करण्यात आला होता. पोलीस आयुक्त मोहित अग्रवाल यांनी गुरुवारी मंदिराच्या सुरक्षेचा आढावा घेतला व गर्भगृहात कोणताही भक्त देवदर्शनापासून वंचित राहू नये, याची खबदरदारी घेण्याच्या सूचना केल्या.
काशी विश्वनाथ मंदिरातील पोलीस आता धोती-कुर्त्यात

मुंबई : काशी विश्वनाथ मंदिराच्या गर्भगृहात तैनात करण्यात आलेले पोलीस आता धोती-कुर्त्यात आपली ड्युटी बजावणार आहेत, तर महिला पोलीस सलवार-कुर्त्यात दिसणार आहेत. भाविकांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. विशेष म्हणजे गर्दी नियंत्रण करताना कोणत्याही श्रद्धाळूला धक्का लागता कामा नये, अशी सक्त ताकीद या पोलिसांना दिली आहे.

यापूर्वी २०१८ साली अशाच प्रकारचा प्रयोग करण्यात आला होता. पोलीस आयुक्त मोहित अग्रवाल यांनी गुरुवारी मंदिराच्या सुरक्षेचा आढावा घेतला व गर्भगृहात कोणताही भक्त देवदर्शनापासून वंचित राहू नये, याची खबदरदारी घेण्याच्या सूचना केल्या.

प्रत्येक पोलिसाला ड्युटी करण्यापूर्वी तीन दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. कोणत्याही भक्ताला शंका विचारायची असल्यास ते पोलिसांना विचारू शकतात. भक्तांना देवाचे दर्शन सहजपणे व्हावे, हा यामागील उद्देश आहे.

logo
marathi.freepressjournal.in