आलिशान घरांच्या भाड्यात दोन वर्षांत झाली वाढ

शहरांतील पॉश निवासी वसाहतींमधील सरासरी मासिक भाडे गेल्या दोन वर्षांत आठ ते १८ टक्क्यांनी वाढले
आलिशान घरांच्या भाड्यात दोन वर्षांत झाली वाढ

देशातील पहिल्या सात शहरांमध्ये गेल्या दोन वर्षांत आलिशान घरांच्या भाड्यात आठ ते १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिअल इस्टेट सल्लागार अॅनारॉकच्या मते, देशातील प्रमुख शहरांतील पॉश निवासी वसाहतींमधील सरासरी मासिक भाडे गेल्या दोन वर्षांत आठ ते १८ टक्क्यांनी वाढले आहे. तर त्यांचे भांडवली मूल्य या काळात केवळ दोन ते नऊ टक्क्यांनी वाढले आहे.

अॅनारॉकच्या मते, दिल्ली-एनसीआर मुंबई महानगर प्रदेश , चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद आणि पुणे या देशातील सात प्रमुख शहरांमध्ये खरेदी आणि भाड्याने देण्यासाठी लक्झरी निवासी मालमत्तांची मागणी वाढली आहे. या काळात मुंबईतील वरळीमध्ये सर्वाधिक १८ टक्के भाडेवाढ झाली आहे. या भागातील किमान २००० चौरस फुटांच्या घरांचे दरमहा २ लाख रुपये असलेले भाडे यंदा २.३५ लाख रुपयांवर पोहोचले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in