विरोधी पक्षांच्या प्रचाराला आम्ही घाबरत नाही; केरळच्या सत्ताधारी माकपची स्पष्टोक्ती

केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात व्यापक निदर्शने केल्याबद्दल भाजपने सीपीआय(एम) नेतृत्वाखालील एलडीएफ आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफवर टीका करणे सुरूच ठेवले.
विरोधी पक्षांच्या प्रचाराला आम्ही घाबरत नाही; केरळच्या सत्ताधारी माकपची स्पष्टोक्ती
Published on

तिरुवनंतपूरम : मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनाही केजरीवाल यांच्यावरील कारवाईप्रमाणे सामोरे जावे लागेल, अशा विरोधी पक्षांच्या प्रचाराला आम्ही घाबरत नाही, असे सत्ताधारी माकपने स्पष्ट केले आहे. माकपचे केरळमधील नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री पी. ए. मोहम्मद रियास यांनी सांगितले की, राज्यातील लोक राजकीयदृष्ट्या जागरूक आहेत आणि ईडी राज्यात येते का तेच पाहूया.

न्यायालयाने केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत पाठवल्यानंतर रियास यांनी ही प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनाही अशाच प्रकारचा सामना करावा लागेल. या राजकीय प्रतिस्पर्ध्यांच्या मोहिमेबद्दल पत्रकारांनी छेडले असता, त्यांनी हे उत्तर दिले. ते म्हणाले की, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अटकेने आता हे स्पष्ट झाले आहे की राष्ट्रीय तपास यंत्रणांचा ‘राजकीय साधन’ म्हणून केंद्र गैरवापर करत आहे. केजरीवालप्रकरणी ईडीच्या कारवाईबाबत काँग्रेसने दुटप्पी भूमिका स्वीकारल्याबद्दल मंत्र्यांनी टीका केली.

दरम्यान, केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात व्यापक निदर्शने केल्याबद्दल भाजपने सीपीआय(एम) नेतृत्वाखालील एलडीएफ आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफवर टीका करणे सुरूच ठेवले.

logo
marathi.freepressjournal.in