डॉलरच्या तुलनेत सार्वकालिक नीचांकी पातळी गाठण्यापासून रुपया सावरला

डॉलरच्या तुलनेत सार्वकालिक नीचांकी पातळी गाठण्यापासून रुपया सावरला

भारतीय शेअर बाजारात झालेली वाढ झाल्याने सकारात्मक फायदा रुपयाला बळ मिळण्यात झाला.
Published on

मंगळवारी सकाळच्या व्यवहारात रुपयाने डॉलरच्या तुलनेत पहिल्यांदाच सार्वकालिक ८०.०५ रुपये प्रति डॉलर नीचांकी पातळी गाठली होती. मात्र, दिवसअखेरीस सहा पैशांनी मजबूत होऊन डॉलरचा नवा भाव ७९.९२ झाला. भारतीय शेअर बाजारात झालेली वाढ झाल्याने सकारात्मक फायदा रुपयाला बळ मिळण्यात झाला.

मागील सत्रात सोमवारी दिवसभरात रुपया सुमारे ८०च्या नीचांकी पातळीवर पोहचल्यानंतर १६ पैशांनी घसरुन ७९.९८ वर बंद झाला होता. रुपया ७९.९८ रुपये प्रति डॉलर होता. मंगळवारी सकाळी रुपयाची सुरुवात ७९.९८ प्रति डॉलरने झाली आणि लगेचच रुपयाचं मूल्य आणखी कमी होऊन ८०.०५ प्रति डॉलर झाले होते. मात्र, दिवसअखेरीस ७९.९२ वर बंद झाला. रुपयाच्या घसरणीमागे कच्च्या तेल्याच्या किमतीतील वाढ आणि बाजारातून काढण्यात येणारी परदेशी गुंतवणूक ही कारणे आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रुपयाच्या पडझडीमागे रशिया युक्रेन युद्ध, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि दबावात असलेली अर्थव्यवस्था असे अनेक जागतिक कारणं असल्याचे म्हटले आहे

logo
marathi.freepressjournal.in