डॉलरच्या तुलनेत रुपया झाला १७ पैशांनी कमजोर

मॅक्रोइकॉनॉमिक डाटा आणि अमेरिका - चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर रुपयाची घसरण झाल्याचे सांगण्यात येते
डॉलरच्या तुलनेत रुपया झाला १७ पैशांनी कमजोर

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया गुरुवारी १७ पैशांनी कमजोर झाल्याने नवा दर ७९.३२ झाला. निराशाजनक मॅक्रोइकॉनॉमिक डाटा आणि अमेरिका - चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर रुपयाची घसरण झाल्याचे सांगण्यात येते.

इंटरबँक फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये गुरुवारी स्थानिक चलन ७९.२१वर उघडले आणि अखेरीस ७९.३२ वर बंद झाले. बुधवारच्या बंद दराशी तुलना करत रुपया १७ पैशांनी घसरला. बुधवारी रुपया तब्बल ६२ पैशांनी घसरुन ७९.१५ हा दर झाला होता. चालू आर्थिक वर्षातील ही एका दिवसातील मोठी घसरण ठरली होती.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in