जागतिक बाजारावर झालेल्या परिणामामुळे सेन्सेक्स घसरला

३०-शेअर बीएसई सेन्सेक्स सकाळी घसरणीने उघडला आणि ५०८.६२अंक किंवा ०.९४ टक्का घसरुन ५३,८८६.६१ वर बंद झाला.
जागतिक बाजारावर झालेल्या परिणामामुळे सेन्सेक्स घसरला

बाजारातील विक्रीऱ्या माऱ्याचा प्रभाव भारतीय शेअर बाजारांवर पडला. त्यामुळे मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जवळपास १ टक्का घसरण झाली. सेन्सेक्स ५०९ अंकांनी घसरला. किरकोळ महागाई दर आणि औद्योगिक उत्पादन निर्देशांक जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सावध झाल्याने बाजारावर परिणाम झाला आहे.

दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स सकाळी घसरणीने उघडला आणि ५०८.६२अंक किंवा ०.९४ टक्का घसरुन ५३,८८६.६१ वर बंद झाला. दिवसभरात तो ५७०.२६ अंक किंवा १.०४ टक्के घटून ५३,८२४.९७ ही किमान पातळी गाठली होती. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी १५७.७० अंक किंवा ०.९७ टक्का घटून १६,०५८.३० वर बंद झाला. सेन्सेक्सवर्गवारीत इन्फोसिस, नेस्ले इंडिया, एचसीएल टेक्नॉलॉजीज, हिंदुसतान युनिलिव्हर, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा आणि कोटक महिंद्रा बँक यांच्या समभागात घसरण झाली. तर एनटीपीसी, भारती एअरटेल आणि बजाज फायनान्स यांच्या समभागात वाढ झाली. आशियाई बाजारात शांघाय, टोकियो, सेऊलमध्ये घट तर सोमवारी अमेरिकन बाजारात घसरण झाली होती. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड २.३७ टक्के घसरुन प्रति बॅरलचा भाव १०४.६ अमेरिकन डॉलर्स झाला. तसेच विदेशी गुंतवणूक संस्थांनी सोमवारी भारतीय शेअर बाजारातून १७०.५१ कोटींच्या समभागांची विक्री केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in