भारत-दक्षिण आफ्रिका ट्वेन्टी-२० मालिकेसाठी प्रेक्षकांना १०० टक्के परवानगी मिळणार

भारत-दक्षिण आफ्रिका ट्वेन्टी-२० मालिकेसाठी प्रेक्षकांना १०० टक्के परवानगी मिळणार

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात ९ जूनपासून रंगणाऱ्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी प्रेक्षकांना १०० टक्के परवानगी देण्यात येणार असल्याचे बीसीसीआयने जाहीर केले.

उभय संघांत अनुक्रमे नवी दिल्ली, कटक, विशाखापट्टणम, राजकोट आणि बंगळुरू येथे पाच ट्वेन्टी-२० सामने खेळवण्यात येणार असून लवकरच या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात येईल. बीसीसीआयने आयपीएलच्या प्ले-ऑफच्या सामन्यांसाठी याआधीच संपूर्ण स्टेडियम प्रेक्षकांनी भरण्याची परवानगी दिली आहे.

आर्चर भारताविरुद्धच्या कसोटीला मुकणार

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर पाठीच्या दुखापतीमुळे भारताविरुद्ध जुलै महिन्यात रंगणाऱ्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. आर्चर गेल्या वर्षभरापासून इंग्लंडच्या संघाबाहेर असून तो यंदाच्या आयपीएलमध्येही खेळू शकला नाही. परंतु त्याच्या पाठीच्या दुखापतीने पुन्हा डोके वर काढल्याने तो किमान ऑगस्ट महिन्यापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्याची शक्यता कमी आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in