केजरीवालांना पदावरून दूर करण्याची मागणी फेटाळली

दिल्ली मद्यधोरण घोटाळाकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आल्याने त्यांना मुख्यमंत्री पदावरून दूर करावे, अशी मागणी करणारी याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : दिल्ली मद्यधोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आल्याने त्यांना मुख्यमंत्री पदावरून दूर करावे, अशी मागणी करणारी याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

हा औचित्याचा प्रश्न आहे, मात्र केजरीवाल यांना अटक करण्यात आल्याने त्यांना पदावरून दूर करण्याची मागणी करण्याचा कायदेशीर अधिकार नाही, असेही पीठाने म्हटले आहे.

याप्रकरणी जेव्हा सुनावणी सुरू होती तेव्हा आम्ही हाच प्रश्न त्यांच्यासमोर ठेवला,हा औचित्याचा मुद्दा आहे आणि त्याबाबत कायदेशीर अधिकार नाही, असे पीठाने याचिकाकर्त्याला सांगितले.

नायब राज्यपाल निर्णय घेऊ शकतात

दिल्लीच्या नायब राज्यपालांची इच्छा असल्यास त्याबाबत ते निर्णय घेतील, आम्ही त्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही, असे न्या. संजीव खन्ना आणि न्या. दीपांकर दत्ता यांच्या पीठाने म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in