‘लॉटरी किंग’ सँटियागो मार्टिनला दिलासा

सँटियागो मार्टिनच्यावतीने ज्येष्ठ वकील आदित्य सोंधी व वकील रोहिणी मुसा यांनी सुप्रीम कोर्टात बाजू मांडली. ते म्हणाले, पीएमएलए न्यायालयात एखादा खटला हस्तांतरित केल्यानंतर पूर्व-निर्धारित किंवा अनुसूचित गुन्ह्यांची प्राथमिक सुनावणी प्राधान्याने घ्यायला हवी का? असा प्रश्न याचिकेत उपस्थित केला आहे.
‘लॉटरी किंग’ सँटियागो मार्टिनला दिलासा

नवी दिल्ली : ‘लॉटरी किंग’ सँटियागो मार्टिन विरुद्ध मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी केरळच्या पीएमएलए न्यायालयात सुरू असलेल्या कार्यवाहीवर सुप्रीम कोर्टाने बुधवारी स्थगिती दिली. गेल्या काही दिवसांपासून सँटियागो मार्टिनच्या विरुद्ध केरळच्या पीएमएलए न्यायालयात मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी खटला सुरू होता. आता या खटल्याला स्थगिती देत सुप्रीम कोर्टाने या प्रकरणासंदर्भात ईडीचे म्हणणे काय? त्याची माहिती मागवली आहे.

सँटियागो मार्टिनच्यावतीने ज्येष्ठ वकील आदित्य सोंधी व वकील रोहिणी मुसा यांनी सुप्रीम कोर्टात बाजू मांडली. ते म्हणाले, पीएमएलए न्यायालयात एखादा खटला हस्तांतरित केल्यानंतर पूर्व-निर्धारित किंवा अनुसूचित गुन्ह्यांची प्राथमिक सुनावणी प्राधान्याने घ्यायला हवी का? असा प्रश्न याचिकेत उपस्थित केला आहे.

यावर न्यायमूर्ती एएस ओका आणि उज्ज्वल भुईया यांनी संबंधितांना नोटीस बजावली. दरम्यान, निवडणूक रोख्यांची माहिती सार्वत्रिक झाल्यानंतर यामध्ये अनेक मोठ्या कंपन्यांचे नाव उघड झाले होते. यामध्ये सँटियागो मार्टिन यांचाही सहभाग होता. सँटियागो मार्टिनची कंपनी ‘फ्यूचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस’ या कंपनीने तब्बल १३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे निवडणूक रोखे खरेदी केले होते. त्यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते.

logo
marathi.freepressjournal.in