तालिबान स्टाईल’ हत्येने राजस्थान हादरले,नुपूर शर्माच्या समर्थकाचा गळा चिरला

मंगळवारी दुपारी दोन जण कपड्याचे माप द्यायचे आहे, असे सांगून दुकानात घुसले
तालिबान स्टाईल’ हत्येने राजस्थान हादरले,नुपूर शर्माच्या समर्थकाचा गळा चिरला
Published on

नुपूर शर्माच्या समर्थनार्थ १० दिवसांपूर्वी पोस्ट टाकणाऱ्या तरुणाची गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. या ‘तालिबान स्टाईल’ हत्येने राजस्थान हादरले आहे. या प्रकरणातील आरोपी रियाझ अन्सारी व मोहम्मद गौस यांना अटक करण्यात आली आहे.

कन्हैयालाल तेल यांचे ‘सुप्रीम टेलर्स’ नावाचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी दोन जण कपड्याचे माप द्यायचे आहे, असे सांगून दुकानात घुसले. काही कळायच्या आतच त्यांनी तलवारीने त्याच्यावर अनेक वार केले. त्याचा गळा चिरला व या हल्ल्याचा व्हीडिओ बनवून तो सोशल मीडियावर टाकला. तसेच हत्येची जबाबदारी स्वीकारली. या घटनेनंतर उदयपूरच्या सात पोलीस ठाण्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून १४४ कलम लागू करण्यात आले आहे. या आरोपींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही धमकी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in