संकल्प केला तिथेच मंदिर बांधले -योगी आदित्यनाथ : अयोध्येत आता संचारबंदी लागणार नाही

अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर उपस्थितांसमोर बोलताना योगी बोलत होते.
संकल्प केला तिथेच मंदिर बांधले -योगी आदित्यनाथ : अयोध्येत आता संचारबंदी लागणार नाही

अयोध्या : ज्या ठिकाणी राम मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता, त्यात जागेवर राम मंदिर उभारलं गेलंय. भारताला याच दिवसाची प्रतीक्षा होती. या दिवसाची आपण पाच शतके वाट पाहत होतो. अयोध्या नगरीत आता गोळ्यांचा गडगडाट नसेल, संचारबंदी लागणार नाही, असा विश्वास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला.

अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर उपस्थितांसमोर बोलताना योगी बोलत होते. योगी म्हणाले, “आज भावना व्यक्त करण्यासाठी शब्द सापडत नाहीत. मन भावुक झालं आहे. तुमच्याही त्याच भावना असतील. या ऐतिहासिक आणि पावन क्षणी भारतातील प्रत्येक ठिकाण अयोध्याधाम आहे. प्रत्येक मार्ग राम जन्मभूमीच्या दिशेने येत आहे. प्रत्येकाच्या मनात रामनाम आहे. प्रत्येकाच्या डोळ्यांत आनंदाश्रू आहेत. पूर्ण राष्ट्र राममय आहे. असं वाटतंय आपण त्रेतायुगात आलो आहोत. आज रघुनंदन सिंहासनावर विराजमान झाले आहेत. आज प्रसन्नता आणि संतोषाची भावना आहे.”

“श्रीराम जन्मभूमी हे असं पहिलं प्रकरण असेल, जिथे एखाद्या देशात त्या देशातील बहुसंख्यांक समाजाने त्यांच्या मंदिर निर्माणासाठी एवढी वर्षे लढाई लढली असेल. समाजातील सर्व जाती वर्गाने राम मंदिरासाठी प्रयत्न केले. आज शेवटी तो दिवस आलाच. आज आत्मा प्रफुल्लित झाला आहे. मंदिर तिथंच बनवलं आहे, जिथं बनवण्याचा संकल्प केला होता. संकल्प आणि साधनेच्या सिद्धीसाठी, आपली प्रतीक्षा संपवण्याकरिता आणि संकल्पाच्या पूर्णतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार आणि अभिनंदन”, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in