

नवी दिल्ली : सात आलिशान बीएमडब्ल्यू गाड्या खरेदी करण्याबाबतची निविदा लोकपालांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची निविदा दोन महिन्यांपूर्वी काढण्यात आली होती आणि त्यांची किंमत एकूण पाच कोटी रुपये इतकी होती. आलिशान गाड्या खरेदी करण्याच्या विरोधात विरोधी पक्ष आणि अन्य नागरी संस्थांनी रान उठविले होते. लोकपालांच्या पूर्ण पीठाने एक ठराव करून या गाड्या खरेदी करण्याचा निर्णय रद्द केला. लोकपालांनी १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सात बीएमड्ब्लयू ३ सिरिज ३३० एलआय गाड्यांचा पुरवठा करण्यासाठी निविदांचा प्रस्ताव मांडला होता.
लोकपालचे अध्यक्ष आणि अन्य सहा सदस्यांसाठी या गाड्यांची खरेदी केली जाणार होती. बीएमड्ब्लयू ३३० एलआय एम स्पोर्ट मॉडेलच्या पांढऱ्या रंगाच्या गाड्या हव्या असे निविदेमध्ये स्पष्ट करण्यात आले होते.