उठाबा शिवसेना गटाचे मशाल चिन्हही जाण्याची शक्यता

ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात दिले होते
उठाबा शिवसेना गटाचे मशाल चिन्हही जाण्याची शक्यता

नवी दिल्ली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे गटाची शिवसेना बाळासाहेब यांच्यातील द्वंद्व शिगेला पोहोचले असतानाच आता समता पक्षाने उठाबा शिवसेनेच्या मशाल निशाणीवर सर्वोच्च न्यायालयात दावा ठोकल्याने ही निशाणी देखील ठाकरे गटाला गमवावी लागते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिले होते. दरम्यान, समता पक्षाने मशाल चिन्हावर दावा करत, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्याच्या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

समता पक्षाने मशाल चिन्हावर दावा करत, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्याच्या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने समता पक्षाची ही याचिका फेटाळली. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात समता पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. अलीकडेच ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना शिंदे गटाला धनुष्यबाण निशाणी दिल्यावर ठाकरे गटाकडे मशाल निशाणी राहिली. मात्र, या मशाल निशाणीवर समता पक्षाने दावा करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. समता पक्षाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिले होते. मात्र, समता पक्षाने मशाल चिन्हावर दावा करत, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्याच्या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने समता पक्षाची याचिका फेटाळली. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात समता पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. समता पक्षाकडे पूर्ण कागदपत्रं नसल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता मशाल चिन्हाच्या याचिकेवर ६ आठवड्यांनी पुन्हा सुनावणी होणार आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात दिले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in