दोन दिवसांच्या जीएसटी परिषदेत सर्व राज्यांचे अर्थमंत्री सहभागी होणार

भरपाईची यंत्रणा आणि राज्यांची महसूल स्थिती यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता
दोन दिवसांच्या जीएसटी परिषदेत सर्व राज्यांचे अर्थमंत्री सहभागी होणार

जीएसटी परिषदेची ४७ वी बैठक मंगळवार, २८-२९ जून रोजी चंदिगड येथे होत आहे. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन असणार आहेत. तसेच परिषदेत सर्व राज्यांचे अर्थमंत्री सहभागी होणार आहेत.

या बैठकीत राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार ऑनलाईन गेमिंग, कॅसिनो आणि अश्वशर्यतीवर २८ टक्के जीएसटी आकारला जाण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. भरपाईची यंत्रणा आणि राज्यांची महसूल स्थिती यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय जीएसटी टॅक्स स्लॅबवरही चर्चा होऊ शकते.

राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या समितीचे प्रमुख आणि मेघालयाचे मुख्यमंत्री कोराड संगमा यांच्या समितीने ऑनलाईन गेमिंगवर भाग घेणाऱ्या स्पर्धेच्या प्रवशेफीसह संपूर्ण २८ टक्के जीएसटी आकारण्यात यावा, असे म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in