आगामी हिवाळी अधिवेशन नव्या संसद भवनात होणार

नव्या इमारतीत आत्मनिर्भर भारताचे चित्र स्पष्टपणे दिसेल.
आगामी हिवाळी अधिवेशन नव्या संसद भवनात होणार

संसदेची नवीन इमारत बांधण्याचे काम जोरात सुरू असून आगामी हिवाळी अधिवेशन याच नवीन इमारतीत घेण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीच खुद्द याबाबतचे संकेत दिले आहेत. “नव्या इमारतीत आत्मनिर्भर भारताचे चित्र स्पष्टपणे दिसेल. तांत्रिक आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही नवी इमारत जुन्या संसद भवनाच्या खूप पुढे आहे. जुनी इमारतदेखील त्याचाच एक भाग असेल,” असे ओम बिर्ला यांनी सांगितले.

संसदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम यावर्षी ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल, असे केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी स्पष्ट केले आहे. “आता सभागृह रात्री उशिरापर्यंत चालते. सभागृह सुरळीत चालले पाहिजे, शिस्त आणि सभ्यता राखली गेली पाहिजे, असेही मी वेळोवेळी पक्षाच्या नेत्यांशी बोलतो,” असेही बिर्ला म्हणाले. खासदारांसाठीचे वाचनालय अधिक चांगले व्हावे यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. आता खासदारांसाठी घरपोच पुस्तकांचा पुरवठाही सुरू करण्यात आल्याचे बिर्ला यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in