गुरुग्राममधील जगन्नाथ मंदिराची भिंत कोसळली ;एका कामगाराचा मृत्यू, ४ जणांची प्रकृती गंभीर

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या बचाव पथकाने सर्व कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम राबवली
गुरुग्राममधील जगन्नाथ मंदिराची भिंत कोसळली
;एका कामगाराचा मृत्यू, ४ जणांची प्रकृती गंभीर
PM
Published on

नवी दिल्ली : गुरुग्राममध्ये सोमवारी सेक्टर-१५ मधील भाग-२ येथे बांधकाम सुरू असलेल्या जगन्नाथ मंदिराची भिंत कोसळल्यामुळे ढिगाऱ्याखाली पाच जण जागीच गाडले गेले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या बचाव पथकाने सर्व कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम राबवली, त्यानंतर सर्वांना बाहेर काढण्यात आले. सर्व कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सिव्हिल लाइनवर असलेल्या जगन्नाथ मंदिरात तळघर बांधण्याचे काम सुरू होते, त्यात अनेक मजूर काम करत होते. तळघरातील माती उद्ध्वस्त झाल्याने जवळील भिंत खालून तुटून कामगारांवर पडली. त्यात चंद्रपाल (२६) या मजुराचा मृत्यू झाला. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ नागरी संरक्षण दलाकडून बचाव मोहीम राबवण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in