कोरोना काळात राजकीय पक्षांची संपत्ती वाढली वर्षभरात १५३१ कोटींची वाढ ; एडीआरचा अहवाल

अनेक कामगारांना वेतन कपातीचा सामना करावा लागला किंवा नोकरी गमवावी लागली
कोरोना काळात राजकीय पक्षांची संपत्ती वाढली वर्षभरात १५३१ कोटींची वाढ ; एडीआरचा अहवाल

नवी दिल्ली : देशात २०२०-२१ व २०२१-२२ मध्ये कोरोना काळ सुरू होता. सर्वत्र लॉकडाऊन लागले होते. अनेक कामगारांना वेतन कपातीचा सामना करावा लागला किंवा नोकरी गमवावी लागली. कोट्यवधी बेरोजगार झाले आहे. तरीही देशातील ८ राजकीय पक्षांच्या जाहीर केलेल्या संपत्तीत १ वर्षात १५३१ कोटींनी वाढ झाली आहे. २०२०-२१ मध्ये या पक्षांची संपत्ती ७२९७.६२ कोटी रुपये होती, तर २०२१-२२ मध्ये त्यांची संपत्ती ८८२९.१६ कोटी झाली. निवडणूक सुधारणांसाठी काम करणाऱ्या ‘एडीआर’ संस्थेने ही माहिती जाहीर केली. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बहुजन समाजवादी पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया-माओवादी (सीपीआय-माओवादी), तृणमूल काँग्रेस व नॅशनल पीपल्स पार्टी आदींचा त्यात समावेश आहे. भाजप सर्वात श्रीमंत पक्ष एडीआरने आपल्या अहवालात नमूद केले की, २०२०-२१ मध्ये भाजपने ४९९०.१९५ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली.

२०२१-२२ मध्ये त्यात २१.७ टक्के वाढ होऊन ती ६०४६.८१ कोटी झाली, तर काँग्रेसने २०२०-२१ मध्ये ६९१.११ कोटी मालमत्ता घोषित केली. २०२१-२२ मध्ये त्यात १६.५८ टक्के वाढ होऊन ती ८०६.८६ कोटी झाली. पाच पक्षांचे कर्ज झाले कमी २०२०-२१ मध्ये राष्ट्रीय पक्षांवर १०३.५५ कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यात काँग्रेसवर ७१ कोटी, तर सीपीआय (एम) यांच्यावर १६ कोटींचे कर्ज होते. २०२१-२२ मध्ये काँग्रेसवर ४२ कोटी, सीपीआय (एम) १२ कोटी, तर भाजपवर ५ कोटींचे कर्ज होते.

मार्गदर्शक तत्त्वांना तिलांजली एडीआरने सांगितले की, सर्व राजकीय पक्ष इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाची मार्गदर्शक तत्त्वे पालन करण्यास अपयशी ठरली आहेत. या राजकीय पक्षांनी कोणत्या बँक, वित्त संस्था किंवा कोणत्या संस्थांकडून कर्ज घेतले आहे हे जाहीर करायला हवे होते. बसपाच्या संपत्तीत घट एडीआरच्या अहवालानुसार, बसपाची संपत्ती घटली आहे. २०२०-२१ मध्ये बसपाची संपत्ती ७३२.७९ कोटी होती. ती २०२१-२२ मध्ये ६९०.७१ कोटी झाली.

logo
marathi.freepressjournal.in