अयोध्येत दरवळणार जगातील सर्वात मोठ्या अगरबत्तीचा सुगंध;इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद

ही जगातली सर्वात मोठी अगरबत्ती आहे. या अगरबत्तीचे वजन सुमारे ३६११ किलो इतके आहे.
अयोध्येत दरवळणार जगातील सर्वात मोठ्या अगरबत्तीचा सुगंध;इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद

अयोध्या : अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेकडे देश-विदेशातील लोकांचे लक्ष लागले आहे. सर्व ठिकाणी जल्लोषाचे वातावरण आहे. त्यातच गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील तरसाली शहरातील विहाभाई करशनभाई भारवाड यांनी तब्बल १०८ फूट लांबीची अगरबत्ती बनवली आहे. या अगरबत्तीची नोंद इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने घेतली आहे.

ही जगातली सर्वात मोठी अगरबत्ती आहे. या अगरबत्तीचे वजन सुमारे ३६११ किलो इतके आहे. यामध्ये गुग्गुळ पावडर, नारळ पावडर, बारवी, होमाची सामग्री, विविध औषधी फुले व देशी गीर गाईचे शेण तसेच तूप वापरले आहे. २२ जानेवारीला प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या वेळी ही अगरबत्ती प्रज्वलित करण्यात येणार आहे. ती अयोध्या येथे ट्रॉलरद्वारे नेण्यात येणार आहे. इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड‌्स यांच्याशी महाअगरबत्ती बनवणारे विहाभाई यांनी संपर्क साधल्यानंतर इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या मुख्य संपादिका सुषमा नार्वेकर तसेच विशेष प्रतिनिधी संजय नार्वेकर यांनी विहाभाई यांचे अभिनंदन करून या महाअगरबत्तीची नोंद इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करून त्यांना प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in