श्रीहरीकोटा : इस्त्रोने पाठवलेले चांद्रयान-३ हे चंद्राच्या कक्षेत भ्रमण करत आहे. २३ ऑगस्ट रोजी ते चंद्रावर उतरणार असल्याचे पूर्वी जाहीर केले होते. मात्र, चांद्रयान-३ चंद्रावर उतरण्यासाठी सपाट पृष्ठभागाचा शोध घेणे खूपच कठीण झाल्याची माहिती इस्त्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. यानातील कॅमेऱ्यातून यान सपाट पृष्ठभाग शोधत आहेत. पण अजून तसा भाग काही निदर्शनास आला नाही. त्यामुळे चांद्रयान चंद्रावर उतरण्यास कदाचित २७ ऑगस्टचा दिवस उजाडू शकतो, असे इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी सांगितले.