मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मंदिरे बांधल्याची उदाहरणे आहेत; आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी काढला तोडगा

ज्योतिषमठ शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी अयोध्येतील अपूर्ण असलेल्या राम मंदिराच्या आगामी अभिषेकावर आक्षेप घेतल्यानंतर आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी तोडगा काढत आपले मत व्यक्त केले आहे.
मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मंदिरे बांधल्याची उदाहरणे आहेत; आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी काढला तोडगा

बंगळुरू : ज्योतिषमठ शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी अयोध्येतील अपूर्ण असलेल्या राम मंदिराच्या आगामी अभिषेकावर आक्षेप घेतल्यानंतर आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी तोडगा काढत आपले मत व्यक्त केले आहे. मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मंदिरे बांधल्याची अनेक उदाहरणे आहेत. शंकराचार्य एका विचारसरणीचे आहेत परंतु इतर तरतुदीही आहेत ज्यात प्राणप्रतिष्ठेनंतरही मंदिरे बांधण्याची परवानगी दिली जाते, असे श्री श्री रविशंकर यांनी सांगितले.

प्राणप्रतिष्ठेनंतर तुम्ही मंदिर बांधत राहू शकता अशा इतर तरतुदी आहेत. त्या संबंधात ते म्हणाले की, तामिळनाडूतील रामेश्वरम येथे भगवान रामाने स्वतः शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केली. त्यावेळी मंदिर नव्हते. त्याला मंदिर बांधायला वेळ नव्हता. त्यांनी प्राणप्रतिष्ठा केली आणि नंतर मंदिर बांधले गेले. मदुराई मंदिर आणि तिरुपती बालाजी मंदिर सुरुवातीला लहान होते, जे नंतर राजांनी बांधले, असेही ते पुढे म्हणाले.

अयोध्येत मंदिराच्या गरजेचे औचित्य साधून, अध्यात्मिक गुरू रविशंकर म्हणाले की, ते ५०० वर्षांपूर्वी झालेल्या चुकीची ते दुरुस्ती करत आहेत. हे एक स्वप्न सत्यात उतरत आहे. पाच शतकांपासून लोकांनी याची वाट पाहिली आहे. त्यामुळे संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे.

मंदिराचे काम पूर्ण झाले की अयोध्येला जाईन -शरद पवार

मुंबई: श्रीराम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले की अयोध्येला जाऊन रामाचे दर्शन घेईन, अशी घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांना शरद पवार यांनी एक पत्र लिहिले आहे. त्यात २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास निमंत्रण दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत. २२ जानेवारीनंतर रामलल्लांचे दर्शन सोपे होईल, असे ते म्हणाले.

अयोध्येला जाणार नाही - लालू प्रसाद यादव

पाटणा: राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांचे म्हणणे खोडून काढतांना इंडिया आघाडीच्या लोकसभा जागावाटपास विलंब होणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच लालकृष्ण अडवाणी यांची रामरथ यात्रा बिहारमध्ये अडवल्याबद्दल मोठा अभिमान बाळगणारे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांनी आपण रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आयोध्येस अजिबात जाणार नाही, असे ठामपणे सांगितले आहे.

logo
marathi.freepressjournal.in