भारतात प्रवास वाहन पुरवठ्यात जूनमध्ये वाढ झाली. वार्षिक आधारावर जूनमध्ये १९ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे सेमीकंडक्टरच्या पुरवठ्यात सुधारणा झाल्याचे दिसून येते, असे वाहन उद्योगाची संघटना ‘सियाम’ने म्हटले आहे.
सोसायटी ऑफ इंडियन ॲटोमोबाईल्स मॅन्यूफॅक्चरर्स (सियाम)ने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जूनमध्ये प्रवासी वाहनांचा डीलर्सला होणारा पुरवठा २,७५,७८८ युनिटस् इतका झाला आहे. जून २०२१ मध्ये २,३१,६३३ युनिटस् इतका झाला होता. अशाच प्रकारे दुचाकींचा गाऊक पुरवठ्यातही जूनमध्ये वाढ होत १३,०८,७६४ युनिटस् इतका जाला आहे. मागील वर्षी वरील महिन्यात १०,६०,५६५ युनिटस् पुरवठा झाला होता. तसेच तीनचाकी वाहनांच्या पुरवठ्यात वाढ होऊन जूनमध्ये २६,७०१ युनिटस् झाला आहे. जून २०२१ मध्ये हा पुरवठा ९,४०४ युनिटस् इतका झाला होता. त्यामुळे जूनमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांची विक्री जूनमध्ये वधारुन १६,११,३०० युनिटस्ची झाली असून जून २०२१ मध्ये हा आकडा १३,०१,६०२ युनिटस् होता.