सामर्थ्याशिवाय शांती नाही; पंतप्रधानांची कारगिलला जवानांसोबत दिवाळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली दिवाळी जवानांसोबत कारगिल येथे साजरी केली. त्यावेळी त्यांनी जवानांशी संवाद साधला.
सामर्थ्याशिवाय शांती नाही; पंतप्रधानांची कारगिलला जवानांसोबत दिवाळी

भारत हा कायमच शांतीच्या बाजूने उभा आहे. भारताने युद्ध हा कायम पहिला नव्हे, तर शेवटचा उपाय मानला आहे. पण, सामर्थ्याशिवाय शांती शक्य नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. त्याचवेळी  भारतासमोर वाकडी नजर करू पाहणाऱ्यांना सडेतोड प्रत्त्युत्तर देण्याची क्षमता व रणनीती भारताच्या सैन्य दलात आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली दिवाळी जवानांसोबत कारगिल येथे साजरी केली. त्यावेळी त्यांनी जवानांशी संवाद साधला. 

रामायण-महाभारताचा हवाला देताना पंतप्रधान म्हणाले की, युद्ध भलेही लंकेत होऊ दे किंवा कुरुक्षेत्रात. हे युद्ध शेवटपर्यंत टाळण्यापर्यंत केले गेले. ही भारताची परंपरा आहे. भारत हा विश्वशांतीच्या बाजूने आहे. संपूर्ण जग भारताकडे संतुलन शक्ती म्हणून पाहत आहे.ते म्हणाले की, माझ्यासाठी वर्षानुवर्षे तुम्हीच माझे कुटुंबीय आहात. तुमच्यासोबत माझ्या दिवाळीचा गोडवा वाढत जातो. माझ्या दिवाळीचा प्रकाशही तुमच्यात आहे भारत आपले सर्व सण प्रेमाने साजरे करतो सगळ्या जगाला त्या सामावून घेत साजरे करतो दिवाळीचा अर्थ दहशतवादाच्या अंताचा उत्सव असा आहे कारगिलमध्ये आमच्या सैन्य दलाने दहशतवादाला मोडून काढले पाकिस्तान विरोधात प्रत्येक युद्धात भारताने विजयाचा झेंडा फडकावला आहे असे मोदी म्हणाले कारगिल युद्धाच्या विजयाचा साक्षीदार मी होतो हे माझे सौभाग्य आहे कारण ते युद्ध मी जवळून पाहिले आहे येथील अधिकाऱ्यांनी मला 23 वर्ष जुनी छायाचित्रे दाखवून ते क्षण जागृत केले आम्ही जी मदत करू शकत होतो तेच करायला येथे आलो होतो. आम्ही पुण्या कमवायला आलो होतो असे ते म्हणाले तुम्ही कवच बनवून सीमेवर उभे आहात तर देशात शत्रूच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई केली जात आहे दहशतवाद नक्षलवाद अनेक वर्षापासून वाढत होता तो उघडण्याचे प्रयत्न ते सतत करत आहे देशात नक्षलवाद पसरला होता तो आता कमी होताना दिसत आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in