काँग्रेस अध्यक्षपदासाठी खर्गे, थरूर यांच्यात लढत होणार

चार फॉर्म छाननी समितीने रद्द केले आहेत. नाव मागे घेण्याची तारीख ८ ऑक्टोबर आहे.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी खर्गे, थरूर यांच्यात लढत होणार

काँग्रेसचा नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नेते मलिकार्जुन खर्गे व शशी थरूर यांच्यात लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेसच्या मध्यवर्ती निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितले की, काँग्रेस अध्यक्षपदासाठी आतापर्यंत २० फॉर्म आले आहेत. त्यातील चार फॉर्म छाननी समितीने रद्द केले आहेत. नाव मागे घेण्याची तारीख ८ ऑक्टोबर आहे. या दिवशी कोणीही नाव मागे न घेतल्यास निवडणूक प्रक्रिया पुढे नेण्यात येईल. मलिकार्जुन खर्गे व शशी थरूर हे दोन दिवस निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर के एन त्रिपाठी यांचा फॉर्म सहीमुळे बाद झाला. पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हे अध्यक्ष पदासाठी इच्छुक होते मात्र त्यांनी आपला अर्ज भरला नाही.

राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा खर्गे यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर राज्यसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. खरगे यांनी आपले राजीनामा पत्र सोनिया गांधी यांना पाठवले आहे. उदयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात एक व्यक्ती एक पदी भूमिका खर्गे यांनी मांडली होती. काँग्रेसमध्ये बदल हवा असल्यास मी थरूर अध्यक्षपदाच्या रिंगणात उतरलेल्या शशी थरूर यांना सांगितले की खर्गे यांच्या विरोधात माझी कोणतीही लढाई नाही मात्र जुनी काँग्रेस हवी असल्यास खर्गे यांना मत द्या बदल हवा असल्यास मी उभा आहे.

राजस्थान काँग्रेसमध्ये झालेल्या अंतर्गत वादा नंतर अशोक गहलोत हे अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले. त्यानंतर खरगे व थरूर यांच्यात लढत होईल. येत्या 17 ऑक्टोबरला काँग्रेसचे अध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे

logo
marathi.freepressjournal.in