‘नीट’च्या गोंधळाची उच्चस्तरीय चौकशी होणार

वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली ‘नीट यूजी’ परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
‘नीट’च्या गोंधळाची उच्चस्तरीय चौकशी होणार

नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली ‘नीट यूजी’ परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप देशभरातून होत आहे. आता ‘नीट’मध्ये दिल्या गेलेल्या अतिरिक्त गुणांच्या चौकशीसाठी चारसदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा ‘एनटीए’चे महासंचालक सुबोध कुमार सिंह यांनी केली. ते म्हणाले की, ‘नीट’ परीक्षेतील गोंधळाचा प्रकार केवळ ६ सेंटरमधील १६०० परीक्षार्थींशी संबंधित आहे. यापूर्वी आम्ही तज्ज्ञांची समिती बनवली होती. आता आम्ही आणखी एक उच्चस्तरीय समिती बनवली आहे.

पेपरफुटीची चर्चा, विद्यार्थ्यांना मिळालेले भरमसाट गुण, अतिरिक्त गुणांची खैरात आदींमुळे यंदाची ‘नीट’ परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली. १५६३ उमेदवारांना ‘नीट’ परीक्षेत ग्रेस गुण मिळाले. त्यातील ७९० परीक्षार्थींना ‘अतिरिक्त गुण’ (ग्रेस मार्क) मिळाले आहेत. अन्य जणांचे गुण नकारात्मक राहिले किंवा ते अनुत्तीर्ण होऊ शकले.

यूपीएससीचे माजी अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यीय समिती ‘नीट’ परीक्षेतील गोंधळाचा अभ्यास करणार आहे. या समिती शिक्षण, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असेल. मात्र, त्यांची नावे जाहीर करण्यास त्यांनी नकार दिला. तसेच ‘नीट’ची परीक्षा रद्द होणार नाही, तर केवळ ६ केंद्रांवरच फेरपरीक्षा होऊ शकते, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in