जातीनिहाय जनगणना रोखण्याचा विचार तुमचे स्वप्नच ठरेल -राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच देशात जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच देशात जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत. आता त्यांच्या या मागणीला केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनीदेखील समर्थन दर्शवले आहे. राहुल गांधी यांनी याच मुद्द्यावरून रविवारी मोदी सरकारला धारेवर धरले.

“मोदीजी, तुम्ही जात जनगणना थांबवण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही स्वप्न पाहत आहात. आता कोणतीही शक्ती जात जणगणना थांबवू शकत नाही. भारताचा आदेश आला आहे, लवकरच ९० टक्के भारतीय जात जनगणनेला पाठिंबा देतील आणि मागणी करतील. आताच आदेशाची अंमलबजावणी करा, नाहीतर पुढचे पंतप्रधान जातगणना करताना दिसतील,” अशी बोचरी टीका राहुल गांधी यांनी ‘एक्स’वरून केली आहे.

राहुल गांधी म्हणाले की, “मी माजी मिस इंडियाची यादी पाहिली, पण विजेत्यांमध्ये एकही दलित, आदिवासी किंवा ओबीसी आढळली नाही.

logo
marathi.freepressjournal.in