तिरुवनंतपुरम महापालिकेचा दणका; भाजपला ठोठावला १९.७ लाखांचा दंड

तिरुवनंतपुरम महानगरपालिकेने भारतीय जनता पार्टीवर १९.७ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केरळ दौऱ्यादरम्यान शहरात पदपथांवर फ्लेक्स बोर्ड लावल्याबद्दल हा दंड आकारण्यात आला आहे.
तिरुवनंतपुरम महापालिकेचा दणका; भाजपला ठोठावला १९.७ लाखांचा दंड
Published on

तिरुवनंतपुरम : तिरुवनंतपुरम महानगरपालिकेने भारतीय जनता पार्टीवर १९.७ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केरळ दौऱ्यादरम्यान शहरात पदपथांवर फ्लेक्स बोर्ड लावल्याबद्दल हा दंड आकारण्यात आला आहे.

बोर्ड लावल्यामुळे परिसरातील लोकांना अडचणींचा सामना करावा लागला होता. याप्रकरणी तिरुवनंतपुरम महापालिकेच्या सचिवांच्या तक्रारीनंतर, कॅन्टोनमेंट पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा भाजपचे जिल्हाध्यक्ष करमना जयन यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

डिसेंबरमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत तिरुवनंतपुरममध्ये भाजपने ५० जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर २६ डिसेंबरला भाजपचे व्ही. व्ही. राजेश हे महापौरपदी आरुढ झाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in