स्वातंत्र्य दिनाचे भाषण नव्हे, हा तर निवडणूक प्रचार -काँग्रेस

मी पुन्हा येणार या मोदींच्या शब्दातून घमेंड दिसून येत असल्याचे विधान खर्गे यांनी केले आहे
स्वातंत्र्य दिनाचे भाषण नव्हे, हा तर निवडणूक प्रचार -काँग्रेस

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावर टीका करताना काँग्रेसने हे भाषण नव्हते तर निवडणूक प्रचार होता, तसेच तो असत्य आणि विकृतीने भरलेला होता. त्या भाषणात अतिशयोक्ती आणि अस्पष्ट आश्वासनांचा समावेश होता.

मी पुन्हा येणार या मोदींच्या शब्दातून घमेंड दिसून येत असल्याचे विधान खर्गे यांनी केले आहे. तसेच काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी म्हटले आहे की, मोदी यांनी आपल्या भाषणात गेल्या ९ वर्षांत आपल्या सरकारने काय केले हे सांगण्यापेक्षा निवडणूक प्रचार करणे अधिक पसंत केले. त्यांच्या भाषणात विकृती, असत्य, अतिशयोक्ती आणि अस्पष्ट आश्वासनांचा समावेश होता. मोदींचे गेल्या ९ वर्षांतील अपयश दुर्नीती, अन्याय व बदनियत या शब्दात सांगता येर्इल, असेही रमेश यांनी म्हटले आहे. मणिपूरमधील हिंसाचाराची तुलना त्यांनी देशात अन्यत्र घडत असलेल्या घटनांशी केली. आपल्या चुकांबद्दल त्यांना दु:ख वाटत नाही. अमृतकालामध्ये भारतमाता पुनर्जीवित होत आहे, असेही मोदी यांनी सांगतले. मात्र ते चक्क खोटे आहे, अशी टिप्पणी जयराम रमेश यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in