नवी दिल्ली : भाजप सरकारकडून ‘गुजरात मॉडेल’ किंवा ‘न्यू इंडिया’च्या नावाने दिल्या जाणाऱ्या भूलथापांवर विश्वास ठेवू नका, असा हल्लाबोल काँग्रेसने सोमवारी केला. वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पातून फॉक्सकॉन या आंतरराष्ट्रीय कंपनीने माघार घेतली आहे. त्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले की, या प्रकल्पाची घोषणा झाली तेव्हा काय प्रसिद्धी केली होती. गुजरातचे मुख्यमंत्री एक लाख रोजगार निर्माण होणार, अशी घोषणा करत होते. माजी मंत्री व काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनीही देशासाठी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.