यामुळेच आम्ही मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला - काँग्रेस

लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस मंजूर केली आहे
यामुळेच आम्ही मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला - काँग्रेस

आज संसदेत पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस असून काँग्रेस आणि बीआरएसने मणिपूर मुद्दावरून मोदी सरकारला घेरलं. यावेळी दोन वेगवेगळ्या अविश्वास प्रस्तव्याच्या नोटीस दिल्या गेल्या होत्या. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी ही नोटीस मंजूर केली आहे. सध्या राज्यात एका मागून एक गोष्टी घडत आहेत. त्यामुळे जनतेचा सरकारवर असलेल्या विश्वासाला तडा जात असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर हिंसाचारावर बोलावं अशी आमची इच्छा आहे. पण ते आमचे ऐकत नाहीत म्हणून आम्ही अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला असलल्याची माहिती काँग्रेसने दिली.

काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांची सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाची सूचना लोकसभेत मंजूर झाल्याचं दिसत आहे . या प्रस्तावाच्या सूचनेला सभागृहातील ५० सदस्याचा पाठिंबा मिळाला आहे. त्यांनी पहाटे ९:२० ला लोकसभेत महासचिवाच्या कार्यालयात अविश्वास प्रस्तावाची सूचना दिली. ३ मे पासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. तरी विरोधीपक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या मुद्द्यांवर सभागृहात सविस्तर बोलावं, अशी मागणी केली. गृहमंत्री अमित शहा यांच्या उत्तरानुसार सरकार मणिपूरवर हिंसाचारावर चर्चेसाठी तयार आहेत. मात्र मोदी बोलायला तयार नाहीत. त्यामुळे विरोध आपल्या मुद्यावर ठाम आहेत.

logo
marathi.freepressjournal.in