यंदा इलेक्ट्रिक वाहनांची विक्री १० लाखांपर्यंत पोहोचणार

आर्थिक वर्षाच्या तुलनेत इलेक्िट्रक स्कूटरची विक्री दुपटीहून अधिक ७.५ लाखांपर्यंत होऊ शकते.
यंदा इलेक्ट्रिक वाहनांची विक्री १० लाखांपर्यंत पोहोचणार

देशात मोठ्या प्रमाणावर इलेक्टि्रक वाहनांची विक्री वाढत आहे. पर्यावरण राखण्यासाठी इलेक्टि्रक वाहने उपयुक्त ठरत आहेत. तसेच पेट्रोल व डिझेलच्या तुलनेत इलेक्टि्रक वाहने खर्च कमी करणारी ठरत आहेत. यंदाचे आर्थिक वर्ष देशातील इलेक्िट्रक वाहन उद्योगासाठी मैलाचा दगड ठरू शकते. सोसायटी ऑफ इलेक्िट्रक व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स (SMEV)२०२२-२३ मध्ये इलेक्टि्रक वाहनांची विक्री २०२१-२२च्या तुलनेत ८४ टक्के वाढून १० लाखांपर्यंत पोहोचू शकते. यात दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचा मोठा वाटा असेल.

‘एसएमईव्ही’च्या अहवालानुसार, गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत इलेक्िट्रक स्कूटरची विक्री दुपटीहून अधिक ७.५ लाखांपर्यंत होऊ शकते. तर इलेक्िट्रक कारची विक्री जवळपास दीड पटीने वाढून ४५ हजारांपेक्षा जास्त होऊ शकते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत इलेक्िट्रक वाहनांची विक्री गेल्या वर्षीच्या एकूण विक्रीच्या ५०टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहे.

जगातील अनेक देशांच्या तुलनेत एकूण ईव्ही विक्रीत भारताचा वाटा खूपच कमी आहे. इंडियन प्रायव्हेट इक्विटी अॅण्ड व्हेंचर कॅपिटल असोसिएशन (आयव्हीसीए)नुसार, देशातील ईव्ही उद्योग २०३०पर्यंत एक कोटी प्रत्यक्ष आणि पाच कोटी अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण करेल, अशी अपेक्षा आहे.

भारतात २०२१मध्ये, पीई/ व्हीसी गुंतवणूकदारांनी इलेक्टि्रक उद्योगात १३,५०० कोटींहून अधिक गुंतवणूक केली होती. २०२२ च्या पहिल्या सहामाहीत ५५०० कोटींहून अधिक गुंतवणूक झाली आहे. दुसऱ्या सहामाहीत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. यासंदर्भात, २२-२३ या आर्थिक वर्षात देशातील ईव्ही उद्योगात १५ हजार कोटींहून अधिक गुंतवणूक केली जाऊ शकते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in