‘त्या’ खासदारांना १४ दिवसांत एक जागा सोडावी लागेल ;घटनाविषयक तज्ज्ञांचे मत

‘त्या’ खासदारांना १४ दिवसांत एक जागा सोडावी लागेल ;घटनाविषयक तज्ज्ञांचे मत

आता या निवडणुकीत विजयी झालेल्या खासदारांनी १४ दिवसांमध्ये जर आपल्या संसदेतील सदस्यत्वाचा राजीनामा दिला नाही तर त्यांचे ससंदतेली सदस्यत्व आपोआप गमवावे लागेल

नवी दिल्ली : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या चार राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये जे खासदार निवडणुकीच्या रिंगणात होते, त्यांच्यापैकी जे विजयी होतील, त्यांना घटनेतील तरतुदीनुसार पुढील १४ दिवसांमध्ये आपल्या संसदेतील सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल, असे तज्ज्ञांनी सांगितले.

या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भारतीय जनता पक्षाने मंत्र्यांसह २१ खासदार उतरविले होते. यामध्ये नरेंद्रसिंह तोमर, प्रल्हाद सिंह पटेल, फगनसिंह कलुस्ते, आदींचा समावेश आहे. यामध्ये प्रत्येकी सात राजस्थान व छत्तीसगडमध्ये, चार मध्य प्रदेशात आणि तीन तेलंगणात निवडणूक लढवीत होते.

आता या निवडणुकीत विजयी झालेल्या खासदारांनी १४ दिवसांमध्ये जर आपल्या संसदेतील सदस्यत्वाचा राजीनामा दिला नाही तर त्यांचे ससंदतेली सदस्यत्व आपोआप गमवावे लागेल. अर्थात ते त्यावेळी विधानसभेतील आपले सदस्यत्व राखू शकतील. घटनातज्ज्ञ आणि माजी लोकसभा महासिचव पी. डी. टी. आचारी यांनी ही माहिती दिली. संविधानाच्या कलम १०१ नुसार १९५० मध्ये राष्ट्रपतींनी जारी केलेल्या नियमानुसार एकाचवेळी एकापेक्षा अधिक सदस्यत्व असण्यास प्रतिबंध केला गेला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in