जम्मू-काश्मीरच्या राजौरीत लष्कराच्या वाहनावर दहशदवादी हल्ला ; तीन जवानांना वीरमरण

गेल्या दोन वर्षात या भागात सुरु असलेल्या दहशतवाविरोधी कारवायांमध्ये ३५ हुन अधिक जवानांना वीरमरण आले आहे. मागील महिन्यात राजौरीतील कालाकोटमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या दहशतवाद विरोधी कारवाईत दोन कॅप्टनसह सैनिक शहीद झाले होते.
जम्मू-काश्मीरच्या राजौरीत लष्कराच्या वाहनावर दहशदवादी हल्ला ; तीन जवानांना वीरमरण

जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमधील थानामांडी भागात आज(२१ डिसेंबर) दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर अचानक हल्ला केल्याची घटना घडली. यात भारतीय लष्कराच्या तीन जवानांना वीरमरण आले आहे. तर अन्य तीन जवान गंभीररित्या जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केल्यानंतर आपल्या जवानांकडून देखील त्यांना चोख प्रत्युत्तर दिले गेले. काल संध्याकाळपासून या ठिकाणी लष्कराकडून सर्च ऑपरेशन राबवले जात आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, राजौरी सेक्टरमधील थानामंडी भागात दहशतवाद्यांनी अचानक लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला. यानंतर आपल्या जवानांकडून त्यांना जोरादर प्रत्युत्तर देण्यात आले. भारतीय सैन्याच्या 48 राष्ट्रीय रायफलकडून काल संध्याकाळपासून या भागात सर्च ऑपरेशन सुरु आहे.

दरम्यान, गेल्या दोन वर्षात या भागात सुरु असलेल्या दहशतवाविरोधी कारवायांमध्ये ३५ हुन अधिक जवानांना वीरमरण आले आहे. मागील महिन्यात राजौरीतील कालाकोटमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या दहशतवाद विरोधी कारवाईत दोन कॅप्टनसह सैनिक शहीद झाले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in