
चमोली : उत्तराखंडमधील चमोली येथे १९ जुलै रोजी विद्युत ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटना प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. चमोली येथे अलकनंदा नदीच्या काठावरील नमामी गंगे प्रकल्पातील ट्रान्सफॉर्मरचा १९ जुलै रोजी स्फोट होऊन १६ जण ठार आणि ११ जण जखमी झाले होते. या प्रकरणी सहाय्यक अभियंता हरदेवलाल आर्या, लाइनमन महेंद्र सिंग आणि सुपरवायझर पवन चमोला यांना अटक झाली आहे. त्यांच्यावर हलगर्जीपणा दाखवल्याचा आरोप आहे.