देशात तीन कोविड रुग्णांच्या मृत्यूची नोंद

देशात कोविडमुळे दगावलेल्या तीन जणांपैकी एक कर्नाटकात, तर दोन पश्चिम बंगालमधील आहेत.
देशात तीन कोविड रुग्णांच्या मृत्यूची नोंद
PM

नवी दिल्ली : मंगळवारी देशात एकूण २३६ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली असून देशभरातील एकूण कोविड बाधितांची संख्या आता २०३१ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसेच गेल्या २४ तासांत कर्नाटक आणि पश्चिम बंगाल राज्यात मिळून देशात एकूण तीन कोविड रुग्ण दगावल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

देशात कोविडमुळे दगावलेल्या तीन जणांपैकी एक कर्नाटकात, तर दोन पश्चिम बंगालमधील आहेत. मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे. ५ डिसेंबर २०२३ पर्यंत देशातील दैनिक कोविड रुग्णांचा आकडा दोन अंकापर्यंत घसरला होता. सध्या देशात असलेल्या एकूण कोविड सक्रिय रुग्णांपैकी ९२ टक्के रुग्ण घरातच विलगीकरण करून उपचार घेत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in