अयोध्येत तीन खलिस्तानींना अटक

उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अयोध्येत तीन संशयित खलिस्तानी समर्थकांना अटक केली आहे
अयोध्येत तीन खलिस्तानींना अटक

अयोध्या : उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अयोध्येत तीन संशयित खलिस्तानी समर्थकांना अटक केली आहे. शंकरलाल दुसद, अजित कुमार आणि प्रदीप पुनिया अशी अटक केलेल्यांची नावे असून ते शीख फॉर जस्टीस (एसएफजे) या बंदी असलेल्या संघटनेचे समर्थक आहेत. एसजेएफचा म्होरक्या गुरपतवंतसिंग पन्नू असून त्याला भारताने दहशतवादी घोषित केले आहे. नुकतेच संसदेत घुसून पिवळा धूर सोडणाऱ्या युवकांपासून या तिघांनी प्रेरणा घेतली असून ते अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या वेळी खलिस्तानी झेंडा फडकावून खलिस्तानवादी घोषणा देणार होते. पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान तयार करण्याची त्यांची मागणी आहे. हे तिघेही राजस्थानचे रहिवासी असून गुरपतवंतसिंग पन्नूच्या संपर्कात होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in