एसयूव्ही अपघातात तीन ठार

किश्तवारच्या जिल्हा प्रशासनाने जिल्हा रेडक्रॉस फंडांतर्गत मृतांना ५० हजार रुपये आणि गंभीर जखमींना दहा हजार रुपये तात्काळ मदत जाहीर केली.
एसयूव्ही अपघातात तीन ठार

जम्मू : किश्तवाड जिल्ह्यात एक एसयूव्ही रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळल्याने एका अर्भकासह तीन जणांचा मृत्यू झाला आणि १२ जण जखमी झाले. शुक्रवारी संध्याकाळी गुलाबगड-माचैल मार्गावरील हाकू गावात ओव्हरलोड प्रवासी वाहनाचा हा अपघात झाला. या अपघातात दया कृष्णन (३६), सबिता देवी (३०) आणि १५ दिवसांचा मुलगा असे तीन जण ठार झाले असून १२ जण जखमी झाले आहेत. चार गंभीर जखमींना विशेष उपचारांसाठी जम्मूच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) दाखल करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. किश्तवारच्या जिल्हा प्रशासनाने जिल्हा रेडक्रॉस फंडांतर्गत मृतांना ५० हजार रुपये आणि गंभीर जखमींना दहा हजार रुपये तात्काळ मदत जाहीर केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in