PM
राष्ट्रीय
छत्तीसगडमध्ये तिघा नक्षलवाद्यांना अटक
सुरक्षा दलाचे संयुक्त पथक रविवारी क्षेत्र वर्चस्वाच्या ऑपरेशनसाठी होते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
सुकमा : गेल्या महिन्यात सीआरपीएफच्या पथकावर झालेल्या हल्ल्याशी संबंधित तीन नक्षलवाद्यांना छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. या तिघांना जगरगुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांडुमेटा हिल्स येथून पकडण्यात आले, तेथे सुरक्षा दलाचे संयुक्त पथक रविवारी क्षेत्र वर्चस्वाच्या ऑपरेशनसाठी होते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
केंद्रीय राखीव पोलीस दल, त्याची एलिट युनिट-कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट ॲक्शन, स्पेशल टास्क फोर्स आणि जिल्हा पोलीस दल या मोहिमेत सहभागी होते, असे ते म्हणाले. आरोपी, मडकम हांडा (३५), मीडियम पोडिया (३८) आणि कोरसा धुर्वा (२१) यांचा गेल्या महिन्यात सीआरपीएफ पथकावरील हल्ल्यात हात होता.