छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन नक्षलवादी ठार

चकमकीच्या ठिकाणाहून आतापर्यंत तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि दोन शस्त्रे जप्त करण्यात आली
छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन नक्षलवादी ठार
PM

कांकेर : छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात रविवारी सकाळी सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले, अशी माहिती कांकेरच्या पोलीस अधीक्षक इंदिरा कल्याण एलसेला यांनी दिली.

जिल्हा राखीव रक्षक आणि सीमा सुरक्षा दलाचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना कोयालीबेडा भागातील जंगलात ही चकमक झडली. चकमकीच्या ठिकाणाहून आतापर्यंत तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि दोन शस्त्रे जप्त करण्यात आली असून अद्याप कारवाई सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in