छत्तीसगडमध्ये तिघा नक्षलींचे आत्मसमर्पण

तीन कार्यकर्त्यांनी पोलिसांना सांगितले की, ते जिल्हा पोलिसांच्या नक्षलवाद्यांसाठीच्या पुनर्वसन मोहिमेने प्रभावित झाले आहेत
छत्तीसगडमध्ये तिघा नक्षलींचे आत्मसमर्पण
PM

सुकुमा : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात दोन महिलांसह तीन नक्षलवाद्यांनी शनिवारी सायंकाळी आत्मसमर्पण केले. त्यातील एका महिलेवर एक लाख रुपयांचे इनाम होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अमानवी आणि पोकळ नक्षलवादी विचारसरणीबद्दल निराशा व्यक्त करीत या तिघांनी पोलिस आणि सीआरपीएफच्या ५० व्या बटालियनच्या अधिकाऱ्यांसमोर स्वत:ला आत्मसमर्पित केले. दुधी सुकडी (५३), दुधी देवे (३८) आणि मडवी हडमा (२६) अशी आत्मसमर्पण करणाऱ्यांची नावे आहेत. तुमालपाड क्रांतीकारी महिला आदिवासी संघटनेची (नक्षलवाद्यांची आघाडीची शाखा) प्रमुख म्हणून सक्रिय असलेल्या देवे हिच्या डोक्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. तीन कार्यकर्त्यांनी पोलिसांना सांगितले की, ते जिल्हा पोलिसांच्या नक्षलवाद्यांसाठीच्या पुनर्वसन मोहिमेने प्रभावित झाले आहेत, ही घटना 'पुना नरकोम' म्हणजे स्थानिक गोंडी बोली भाषेतील त्यांच्यासाठी नवीन पहाट आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in