जम्मू-काश्मीरमधील अपघातात महाराष्ट्राचे तीन पर्यटक ठार; १७ जखमी

जम्मू-काश्मीरच्या गंदेरबाल जिल्ह्यात श्रीनगर-सोनमर्ग मार्गावर बस व टॅक्सीची टक्कर होऊन झालेल्या अपघातात महाराष्ट्राचे तीन पर्यटक ठार झाले. तसेच स्थानिक कारचालकही मृत्युमुखी पडला, तर १७ जण जखमी झाले.
जम्मू-काश्मीरमधील अपघातात महाराष्ट्राचे तीन पर्यटक ठार; १७ जखमी
Published on

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या गंदेरबाल जिल्ह्यात श्रीनगर-सोनमर्ग मार्गावर बस व टॅक्सीची टक्कर होऊन झालेल्या अपघातात महाराष्ट्राचे तीन पर्यटक ठार झाले. तसेच स्थानिक कारचालकही मृत्युमुखी पडला, तर १७ जण जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी सांगितले की, लेशिया आशिष, निक्की आशिष व हेतल आशिष अशी मृतांची नावे आहेत, तर फहीम अहमद हा स्थानिक चालक अपघातात मृत्यू पावला.

जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा व मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मृतांबद्दल शोक व्यक्त केला आहे. जखमींना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in