

मुंबई : भारतात थायरॉईड विकार हा हळूहळू पण मोठ्या प्रमाणावर वाढणारा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न ठरत असून, त्याची सुरुवातीची लक्षणे अनेकदा ताणतणाव किंवा वय वाढण्याचे नैसर्गिक परिणाम समजून दुर्लक्षित केली जात आहेत.
मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाने केलेल्या नव्या विश्लेषणात नियमित आरोग्य तपासण्यांदरम्यान आढळणाऱ्या थायरॉईड बिघाडाच्या प्रकरणांत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये हा धोका अधिक दिसून येतो.
२०२५ या एका वर्षाच्या कालावधीत करण्यात आलेल्या ११,१२१ थायरॉईड चाचणी अहवालांचे विश्लेषण या अभ्यासण्यात आले. त्यातून सर्व वयोगटांत हायपोथायरॉइडिझम (थायरॉईड संप्रेरकांची कमतरता) शांतपणे वाढत असल्याचे आढळले. एकूण प्रकरणांपैकी २१.७ टक्के अहवालांत टीएसएच (टीएसएच) पातळी सामान्य मयदिपेक्षा जास्त होती. महिलांमध्ये हे प्रमाण २४.५ टक्के असून पुरुषांमध्ये ते १८.९ टक्के होते. वय वाढत जाऊन थायरॉईड बिघाडाचे प्रमाणही सातत्याने वाढताना दिसले. ६० ते ६९ वयोगटातील जवळपास चतुर्थांश लोक, ७० ते ७९ वयोगटातील सुमारे ३०.९ टक्के, तर ८० ते ८९ वयोगटातील जवळपास ३५ टक्के लोक याने प्रभावित होते.
संपूर्ण थायरॉईड फंक्शन टेस्ट पॅनेल हायपोथायरॉइडिझम' आढळून आला. या करण्यात आलेल्या रुग्णांपैकी २०.२ टक्क्यांमध्ये 'सबक्लिनिकल अवस्थेत टीएसएच पातळी वाढलेली असते, मात्र थायरॉईड संप्रेरकांचे मूल्य सामान्य असते. ही स्थिती पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून आली. तसेच ज्येष्ठ रुग्णांपैकी २.६ टक्क्यांमध्ये 'लो टी३ सिंड्रोम' आढळला, जो इतर गंभीर अंतर्गत आजारांकडे निर्देश करू शकतो. अत्यंत कमी टीएसएच पातळी केवळ ०.३८ टक्के अहवालांत आढळली असली, तरी ती चिकित्सकीयदृष्ट्या उच्च जोखमीची मानली जाते. याबाबतीतही महिलांमध्ये संवेदनशीलता अधिक असल्याचे दिसून आले. या निष्कर्षांवर भाष्य करताना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातील प्रयोगशाळा वैद्यक व प्रगत निदान विभागाच्या प्रमुख व सल्लागार डॉ. वर्षा वडेरा यांनी सांगितले की, उपलब्ध आकडेवारीवरून थायरॉईड बिघाड हा भारतातील एक मोठा पण अद्याप पुरेसा निदान न झालेला आरोग्य प्रश्न बनला आहे. वेळेवर तपासणी व योग्य उपचार केल्यास रुग्णांचे जीवनमान लक्षणीयरीत्या सुधारू शकते आणि दीर्घकालीन गुंतागुंत टाळता येऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.
या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका
वैद्यकीय तज्ज्ञांनी सततचा थकवा, कारण नसताना वजन वाढणे, केस गळणे, थंडीची जास्त संवेदनशीलता, स्मरणशक्तीतील अडचणी अशी लक्षणे-विशेषतः रजोनिवृत्तीनंतरच्या महिला आणि वृद्धांमध्ये दुर्लक्षित करू नयेत, असा सल्ला दिला आहे. नियमित आरोग्य तपासण्यांचा अविभाज्य भाग म्हणून थायरॉईड तपासणी करणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.