वाघिणीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

राज्याच्या पर्यावरण विभागाने राष्ट्रीय वाघ संवर्धन प्राधिकरणाला याबाबत कळवले आहे.
वाघिणीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पाटणा : पाटणा येथील प्राणिसंग्रहालयात १५ वर्षांच्या वाघिणीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे, अशी माहिती बिहार सरकारच्या सूत्रांनी दिली.

बिहारचे मुख्य वनसंरक्षक पी. के. गुप्ता म्हणाले की, या वाघिणीचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तिचा व्हिसेरा बरेलीच्या इंडियन व्हेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूटला पाठवला आहे.

तिच्या प्रकृतीवर म्हैसूर प्राणिसंग्रहालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची नजर होती. त्यांनी तिला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आले नाही.

राज्याच्या पर्यावरण विभागाने राष्ट्रीय वाघ संवर्धन प्राधिकरणाला याबाबत कळवले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in