तृणूलकडून २९१ उमेदवारांची यादी जाहीर; ममता नंदीग्राममधून निवडणूक लढवणार नाहीत

निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर भाजपने पश्चिम बंगालमधील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यापाठोपाठ आता राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही तृणमूल काँग्रेसच्या २९१ उमेदवारांची यादी मंगळवारी जाहीर केली.
ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी संग्रहित छायाचित्र
Published on

कोलकाता : निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर भाजपने पश्चिम बंगालमधील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यापाठोपाठ आता राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही तृणमूल काँग्रेसच्या २९१ उमेदवारांची यादी मंगळवारी जाहीर केली. यानुसार, ममता बॅनर्जी नंदीग्राम मतदारसंघाऐवजी भवानीपूरमधून निवडणूक लढवणार आहेत. भाजपने त्यांच्या विरोधात सुवेंदू अधिकारी यांना उमेदवारी दिली आहे. सुवेंदू अधिकारी हे नंदिग्राममधूनही निवडणूक लढविणार आहेत.

ममता बॅनर्जी भवानीपूरमधून निवडणूक लढवणार आहेत. पक्षाने २९१ विधानसभा जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तृणमूल काँग्रेस राज्यातील २९४ पैकी २९१ जागांवर निवडणूक लढवणार असून उर्वरित तीन जागांवर मित्रपक्ष भारतीय गोरखा प्रजातांत्रिक मोर्चा निवडणूक लढविणार आहे, असे ममतांनी जाहीर केले. २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस मोठ्या बहुमताने सत्ता कायम राखेल. या निवडणुकीत आम्ही २२६ पेक्षा जास्त जागा जिंकू, असा विश्वास बॅनर्जी यांनी व्यक्त केला. याचबरोबर, उमेदवारांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांनाही ममता बॅनर्जी यांनी आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.

प्रतिकूल परिणाम

ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला भविष्यात अशी पावले उचलणे टाळण्याची विनंती केली आहे. मी आयोगाला नम्रपणे विनंती करते की, त्यांनी भविष्यात अशी एकतर्फी पावले उचलणे टाळावे, कारण अशा पावलांमुळे भारतीय निवडणूक आयोगाची दीर्घकालीन परंपरा, विश्वासार्हता आणि संस्थात्मक अखंडता धोक्यात येण्याचा धोका आहे. तसेच आपल्या घटनात्मक चौकटीच्या मूलभूत तत्त्वांवरही प्रतिकूल परिणाम होतो.

मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांना पत्र लिहून राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचा मुद्दा उपस्थित केला आहे. सोमवारी पाठवलेल्या या पत्रात, विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर लगेचच निवडणूक आयोगाने चार वरिष्ठ राज्य अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिल्याबद्दल बॅनर्जी यांनी तीव्र चिंता आणि आश्चर्य व्यक्त केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in