

कोलकाता: पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत बंडखोरीने बुधवारी एक अत्यंत नाट्यमय आणि निर्णायक वळण घेतले. पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांना टीएमसीच्या ५८ बंडखोर आमदारांनी विधिमंडळ पक्षनेते म्हणून पाठिंबा दिला आहे. या आमदारांनी आपल्या समर्थनाचे पत्र विधानसभा अध्यक्ष रथींद्र बोस यांच्याकडे सुपूर्द करून अधिकृत पक्ष आपणच असल्याचा दावा ठोकला आहे.
बंडखोर गटाने विधानसभेतील आपल्या नवीन नेतृत्वाची घोषणाही केली आहे. यामध्ये ऋतब्रत बॅनर्जी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी, तर जावेद खान, संदीपन साहा आणि श्युली साहा यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच रघुनाथगंजचे आमदार अखरु झमान यांच्याकडे मुख्य प्रतोद पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पक्षांतर बंदी कायद्यानुसार विधानसभेत अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी मूळ पक्षाच्या एकूण आमदार संख्येपैकी किमान दोन-तृतीयांश आमदारांचा पाठिंबा असणे बंधनकारक आहे. तृणमलूमध्ये एकूण आमदार संख्या ८० असून अपात्रता टाळण्यासाठी आवश्यक संख्या ५४ आहे. बंडखोर गटाने ५४ चा आकडा पार करत ५८ आमदारांचे संख्याबळ दाखवले असल्याने, त्यांचा दावा जर विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारला, तर सभागृहात त्यांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये ममतांचे कट्टर समर्थक
असलेल्या टीएमसीमधील अंतर्गत संघर्ष अधिकच चव्हाट्यावर आला आहे. एकीकडे टीएमसीचा विधिमंडळ पक्ष अभूतपूर्व फाटाफुटीच्या उंबरठ्यावर असताना, दुसरीकडे ममता बॅनर्जीचे जुने निष्ठावंत मानले जाणारे आमदार नयना बंडोपाध्याय, कोलकाताचे महापौर फिरहाद हकीम, अशोक देब आणि कुणाल घोष यांनी नवान्न (सचिवालय) येथे झालेल्या या प्रशासकीय बैठकीला हजेरी लावली.
ममतांना नव्हे, अभिषेकला विरोध
या संपूर्ण घडामोडीत एक विशेष राजकीय संकेत पाहायला मिळाला. विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात बंडखोरांनी ममता बॅनर्जी यांचा उल्लेख 'पक्षाच्या अध्यक्षा' असाच केला आहे. याचा अर्थ, बंडखोरांचे हे युद्ध ममता बॅनर्जी यांच्या विरोधात नसून, सध्याच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतृत्वाविरुद्ध आहे, असे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडखोर आमदारांनी स्पष्ट केले आहे की, विधिमंडळ पक्षाच्या कामकाजात त्यांना अभिषेक बॅनर्जी यांचा हस्तक्षेप आणि हुकूमशाही मान्य नाही. या बैठकीला उपस्थित असलेला एकही आमदार मंगळवारी कोलकाता येथे ममता बॅनर्जी यांनी पुकारलेल्या धरणे आंदोलनात सामील झाला नव्हता. दुसरीकडे, ममता बॅनर्जींचे निष्ठावंत मानले जाणारे शोभनदेव चट्टोपाध्याय, नयना बंडोपाध्याय, मदन मित्रा आणि कुणाल घोष यांसारख्या नेत्यांनी बंडखोरांच्या या बैठकीकडे पूर्णपणे पाठ फिरवली.
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये ममतांचे कट्टर समर्थक
पश्चिम बंगालमधील सत्ता गमावल्यानंतर तृणमूल काँग्रेस इतिहासातील सर्वात मोठ्या अंतर्गत बंडाला तोंड देत आहे. अशातच, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी बुधवारी बोलावलेल्या प्रशासकीय आढावा बैठकीला ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत जवळच्या मानल्या जाणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावल्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घडामोडीमुळे विरोधी पक्ष असलेल्या टीएमसीमधील अंतर्गत संघर्ष अधिकच चव्हाट्यावर आला आहे. एकीकडे टीएमसीचा विधिमंडळ पक्ष अभूतपूर्व फाटाफुटीच्या उंबरठ्यावर असताना, दुसरीकडे ममता बॅनर्जीचे जुने निष्ठावंत मानले जाणारे आमदार नयना बंडोपाध्याय, कोलकाताचे महापौर फिरहाद हकीम, अशोक देब आणि कुणाल घोष यांनी नवान्न (सचिवालय) येथे झालेल्या या प्रशासकीय बैठकीला हजेरी लावली.