नवी दिल्ली : दोन हजारांची नोट परत करण्याचा आजचा (दि.७) शेवटचा दिवस होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २ हजारांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केल्यानंतर आतापर्यंत ८७ टक्के नोटा बँकांमध्ये परत आल्या आहेत. अद्यापी १२ हजार कोटींच्या नोटा परत आलेल्या नाहीत, अशी माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली.
पतधोरणानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, १९ मे रोजी २ हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात ३.५६ लाख कोटी रुपये चलनात होते. २९ सप्टेंबर रोजी ३.४२ लाख कोटी रुपयांच्या नोटा परत आल्या होत्या. त्यानंतर आरबीआयने २ हजारांच्या नोटा परत करायला आठवड्याभराचा अवधी दिला. अद्याप १२ हजार कोटींच्या नोटा परत यायच्या आहेत.