प्रवास न करताही फास्टटॅगमधून टोल गायब;दीड लाख वाहनधारकांना फटका

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील टोलसंदर्भात तक्रारी आणि सुविधांसाठी या कंपनीची स्थापना करण्यात आली.
प्रवास न करताही फास्टटॅगमधून टोल गायब;दीड लाख वाहनधारकांना फटका

नवी दिल्ली : देशातील महामार्ग आणि राज्य महामार्गांवर फास्टटॅगच्या माध्यमातून टोल कापण्याची सुविधा आता वाहन मालकांसाठी डोकेदुखी होऊ लागली आहे. इलेक्ट्रिॉनिक टोल कलेक्शन सिस्टम (ईटीसी) प्रणालीने प्रवास न करताना लाखो जणांचा टोल कापला जात आहे. प्रवास न करता टोल कापला गेल्याच्या लाखो तक्रारी हेल्पलाईन नंबर १०३३ वर नोंद झाल्या आहेत. मागील आर्थिक वर्षात या तक्रारीचा डाटा समोर आला आहे. फास्टटॅगसंदर्भात वर्षभरात साडेआठ लाख तक्रारी आल्या आहेत. म्हणजेच रोज २४०० तक्रारी आल्या आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांतर्गत असलेली भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्रबंधन कंपनी लिमिटेडने २०२२-२३ चा अहवाल जारी केला आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील टोलसंदर्भात तक्रारी आणि सुविधांसाठी या कंपनीची स्थापना करण्यात आली. हेल्पलाईन क्रमांकावर आठ लाख ६६ हजार तक्रारी आल्या आहेत. त्यातील १ लाख ५५ हजार ६५७ जणांनी आपण प्रवास केला नसताना टोल कापला गेल्याचे म्हटले आहे. तसेच १ लाख २६ हजार ८५० जणांनी जास्त टोल कापला गेल्याची तक्रार आहे.

logo
marathi.freepressjournal.in