आयकर विविरण भरण्यासाठी उद्या शेवटचा दिवस ; मुदतवाढीचे कोणतेही संकेत नाहीत

गेल्या वर्षी देखील आयकर विवरण भरण्यास कोणतीही मुदतवाढ देण्यात आली नव्हती.
आयकर विविरण भरण्यासाठी उद्या शेवटचा दिवस ; मुदतवाढीचे कोणतेही संकेत नाहीत
Published on

आयकर विवरण भरण्यासाठी आता उद्याचा शेवटचा दिवस असणार आहे.आज दुपारपर्यंत ६ कोटी नागरिकांनी आयकर विवरण दाखल केलं असल्याची माहिती आयकर विभागाने दिली आहे. ३१ जुलै २०२३ ही आयकर विवरण भरण्याची शेवटी तारीख आहे. सध्या तरी सरकारकडून मुदवाढ मिळाली नाही किंवा तसे संकेत मिळाले नाहीत. गेल्या वर्षी देखील आयकर विवरण भरण्यास कोणतीही मुदतवाढ देण्यात आली नव्हती.

आयकर विभागाने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. आज ३० जुलै दुपारी १ वाजेपर्यंत ५.८३ कोटी लोकांनी लोकांकडून आयटीआर दाखल करण्यात आले आहेत. ही संख्या मागील वर्षी दाखल केलेल्या आयटीआर पेक्षाही जास्त आहे. आज दुपारी ४६ लाखाहून अधिक लोकांनी यशस्वी लॉगिन केलं आहे. शनिवार रोजी १.७८ कोटींहून अधिक लोकांनी लॉगिन केलं. तर रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत १०.३९ लाख आयटीआर दाखल झाल्याची माहिती आयकर विभागाने दिली आहे. करचोरी विरोधात आयकर विभागाने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in