तोशाखाना प्रकरणात इम्रान-बुशरा यांची शिक्षा स्थगित

तोशाखाना प्रकरणात इम्रान आणि बुशरा यांना ३१ जानेवारीला शिक्षा सुनावण्यात आली होती, तर बेकायदा विवाह केल्याप्रकरणी दोघांनाही ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना गुप्त पत्र चोरीप्रकरणी १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
तोशाखाना प्रकरणात इम्रान-बुशरा यांची शिक्षा स्थगित

इस्लामाबाद : सरकारी तिजोरीतील भेटवस्तू विकल्याप्रकरणी (तोशाखाना प्रकरण) पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. याप्रकरणी इम्रान आणि पत्नी बुशरा यांना १४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून, या शिक्षेला इस्लामाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. मात्र, खान यांना आणखी दोन खटल्यांमध्ये शिक्षा झाली असल्याने त्यांना सध्या तरी तुरुंगातच राहावे लागणार आहे.

तोशाखाना प्रकरणात इम्रान आणि बुशरा यांना ३१ जानेवारीला शिक्षा सुनावण्यात आली होती, तर बेकायदा विवाह केल्याप्रकरणी दोघांनाही ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना गुप्त पत्र चोरीप्रकरणी १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आमिर फारुक यांनी सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सांगितले की, इम्रान खान यांच्याविरुद्धच्या खटल्याची सुनावणी ईदच्या सुट्टीनंतर पुन्हा सुरू होईल. सध्या इम्रान अदियाला तुरुंगात आहेत, तर बुशरा यांना इम्रान यांच्या बनीगाला घरात ठेवण्यात आले आहे. या घराचा काही भाग तुरुंगात बदलला आहे. येथे बुशरा यांच्यावर कडक पाळत ठेवण्यात आली आहे. इम्रान यांनी विकलेल्या भेटवस्तूंमध्ये एक मौल्यवान घड्याळ, कफलिंकची एक जोडी, एक महागडा पेन, एक अंगठी आणि चार रोलेक्स घड्याळांचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in