

पोल्लाची : तामिळनाडूतील कोइम्बतूर जिल्ह्यातील पोल्लाची येथे भीषण अपघातात केरळमधील ९ जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण ज्या व्हॅननं (टेम्पो ट्रॅव्हलर) प्रवास करत होते, ती सुमारे ८०० फूट खोल दरीत कोसळली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॅन अथिरप्पल्लीहून पोल्लाचीच्या दिशेने प्रवास करत होती. वालपराई येथील १३व्या 'हे अरपिन बेंड'वर (तीव्र वळणावर) त्या व्हॅनची धडक संरक्षक कठड्याला बसली. या व्हॅनमधून केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील 'पांग पल्लिपरंबा
शाळे'चे विद्यार्थी आणि शिक्षक प्रवास करत होते. काही शिक्षकांसोबतच, त्यांचे कुटुंबीयही या व्हॅनमध्ये उपस्थित होते. व्हॅनमध्ये १६ प्रवासी या भीषण अपघातात मृत झालेल्यांची ओळख पटली आहे. मृतांमध्ये अजिता (५४) यांचा समावेश असून त्या पुलमंथोल येथील रहिवासी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. तसेच रामला (५२), सुहारा (४३), आशा (४१), मजीद (४३), सजिता (४५), शकीला (३७)
मोदींकडून संवेदना व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केल्या. तमिळनाडूतील कोइम्बतूर येथे झालेल्या अपघाताबद्दल ऐकून मला अत्यंत दुःख झाले. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याप्रति मी मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो, असे त्यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
आणि रुकिया (३९) यांचा समावेश असून हे सर्व शिक्षक होते आणि पांग परिसरातील रहिवासी होते. याशिवाय व्हॅन चालक नौशाद (३९) यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
व्हॅनमध्ये एकूण १६ प्रवासी होते. वलपराई येथे फिरून हे सर्वजण शुक्रवारी सायंकाळी पोल्लाचीमार्गे केरळकडे परतत होते. त्यावेळी हा अपघात घडला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, वालपराईच्या डोंगराळ रस्त्यावरील १३व्या 'हेअरपिन वळणावर' (तीव्र वळणावर) चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर हे वाहन संरक्षक कठड्यावर (गार्डरेलवर) आदळले आणि जंगलातील एका खोल दरीत ८०० फूट खाली कोसळले.
अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना उपचारासाठी पोल्लाची येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतदेह वालपराई पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून बाहेर काढले. अपघातातील वाहनाचा पूर्णपणे चुराडा झाला आहे.